About Us
ग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाविषयी
आज देशातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तस तसा रोजगाराचा प्रश्नही भेडसावत आहे. नोकऱ्यांची मागणी व उपलब्धता यात मोठे अंतर निर्माण झाले आहे. तरूण/तरूणींची धावपळ / स्पर्धा वाढत आहे. कुटुंबप्रमुखाचे / गृहिणींचे बजेट विस्कळीत झाले आहे. या सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्वयंरोजगार हाच पर्याय दिसतो आहे. आपल्यातील छंद व आवडीचे रोजगारात रूपांतर होणे गरजेचे आहे. या स्पर्धेच्या युगात गृहिणीसुद्धा पुढे आहेत. अनेक गृहिणींनी बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करून आपल्या कुटुंबाची आर्थिक बाजू बळकट केली आहे. शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिला बचत गटांकरिता अनेक योजना राबविण्यात येत आहेत. कर्जपुरवठा, प्रशिक्षण, प्रदर्शनी इत्यादींचा यात समावेश आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही उपजत कलागुण, छंद असतात त्याचे रोजगारात रूपांतर होऊ शकते म्हणूनच ग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाच्या माध्यमातून ‘गृहिणींना घर बसल्या रोजगार’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमा अंतर्गत बचत गटाप्रमाणे उद्योग समूहाचे निर्माण करून त्यांच्या आवडी व छंदाप्रमाणे वस्तू / पदार्थ निर्मितीस प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यात येत आहे. आपणच ग्राहक आहोत व आपणच निर्माते आहोत. गरज आहे ती एकत्र येण्याची. जिल्ह्यातील संपूर्ण महिला उद्योग समूह एकत्र जोडल्यास वस्तूंची देवाण-घेवाण वाढेल व काही प्रमाणात का होईना रोजगाराचा प्रश्न संपुष्टात येईल.
Mission
To empower women through home-based self-employment by transforming skills and hobbies into sustainable income opportunities. To strengthen rural and urban households through economic self-reliance.
Vision
To build a strong network of women-led home industries across India. To create an inclusive and self-sustaining ecosystem for women entrepreneurs.
Objectives
To provide training, guidance, and market access to women industry groups. To promote unity, product exchange, and steady income generation among members.
